Monday, August 24, 2015

सरल१

💻सरल माहीती 💻            💻कशी भरावी 💻
सध्या सरल प्रणालीचे काम चालु आहे.खुप शिक्षकांनी काम करतांना अडचणी येत आहे.खुप कमी शाळेने काम पुर्ण केले आहे .आणि बर्याच प्रमाणात काम बाकी आहे.आपण हे काम मोबाईल द्वारे सुद्धा करु शकतो आणि साईट सुरळीत आसताना प्रत्येकाने काम सुरु केल्यानंतर काम लवकर पुर्ण होइल म्हणुन त्याविषयी माहिती कशी भरावयाची याविषयी माहिती देत आहे.

www.education.maharashtra.gov.in

या साईटवर सरल प्रणाली मध्ये तीन पोर्टल दिलेले आहेत
1) शाळा
2) कर्मचारी वर्ग
 3) विद्यार्थी .
आश्याप्रकारे तीन विभागात माहिती भरायची आहे.

💻1)  जर आपणास  इंग्लिश भाषा अस्खलितपने जमत आसेल तर ठिक आहे नसेल तर साईटवर मराठी भाषेचे ऑप्शन आहे.साईट ओपन केल्यानंतर Contact Us च्या खाली Change Language To : Marathi आसे दिसेल तेथे Marathi ला क्लिक करा.भाषा मराठी होइल.
💻2) मग लगेच आपणास दिसेल शाळा , कर्मचारी वर्ग ,विद्यार्थी.
शाळा

💻1) शाळा या पोर्टल ला क्लिक करा तेथे आपणास  लॉगिन तपशील दिसेल त्यामध्ये युजर आयडी दिसेल त्यात तुमच्या शाळेचा यु डायस नंबर टाका  त्याखाली पासवर्ड दिसेल त्याठीकाणी संचमान्यतेच्या वेळेस जो पासवर्ड तयार केला होता तो टाका.त्यानंतर कॅप्चा म्हंजेच जे अंक किंवा अक्षर दिसतील ते टाका. नंतर लॉगिन वर क्लिक करा.तुमची शाळा ओपन होइल.
 उदा. युजर आयडी 27150501501 पासवर्ड जो आसेल तो ( आपण सरासरी संचमान्यतेच्या वेळेस आपल्या शाळेचे नाव त्यात पहिले अल्फाबेट कॅपीटल उदा.Memana आणि पुढे 123!@# असा तयार केला होता जर वेगळा आसेल तर तो टाका ) त्यानंतर कॅपचा दिसेल तो  कॅपचा टाका
उदा.युजर आयडी27070600115 पासवर्ड Memana123!@# आणि खाली  कॅपचा दिसेल तो टाकुन लॉगीन करा तुमची शाळा ओपन होइल तेथे जिल्हा तालुका केंद्र  तुमच्या शाळेचा युडास क्रमांक , केंद्राचा कोड ,शाळेचे नाव ,खालचा वर्ग ,सर्वात वरचा वर्ग ,शाळा व्यवस्थापन , स्कुल स्टेटस दिसेल ही माहिती तुमचीच आहे का याची खात्री करा.आणि त्यानंतर  शाळेची संपुर्ण माहीती भरु शकता.

💻शाळा ओपन झाल्यानंतर आपणास आडव्या रांगेत 14 प्रकारचे तक्ते दिसतील त्यामधील 1) मुखपृष्ट दिसेल त्याला काहीच करु नका कारन तेथे शाळा सर्च करने आहे परंतु तुमची शाळा ओपन झाली आसल्यामुळे मुखपृष्ट ला टच करु नका.

💻2) पायाभुत . यावर क्लिक करा यामध्ये आपणास 9  फॉर्म दिसतील ते टप्याटप्प्याने  भरा .यामधील प्रत्येक फॉर्म  काळजीपुर्वक भरल्यांतर Update वर क्लिक करा आणि यानंतर आपन भरलेली माहिती आपणाला आता कसल्याच प्रकारे बदल करन्याची गरज नाही आणि आपन भरलेली माहीती  अगदी बरोबर आहे  आसे वाटल्यास नंतर Finalize वर क्लिक करा .त्यानंतर तुमची माहीती Finalize होइल .
पायाभुत मधील सर्व 9 फॉर्म माहिती भरुन अपडेट करु फायनलाईज्ड करा त्याशिवाय तुम्हाला पुढील माहीतीचे फॉर्म Update व Finalize करता येनार नाही .
 त्यानंतर

3)पुर्व प्राथमिक : तीन फॉर्म
4) तपासणी : 8  फॉर्म
5) अनुदान आणि निधी : 3 फॉर्म
6) समिती : 8 समित्या आहेत ज्या लागु आहेत त्या भरु शकता.
7) बालशिक्षन हक्क माहिती : 4 फॉर्म
8) मध्यानह भोजन योजना : 2 फॉर्म
9) पायाभुत सुविधा : 11 फॉर्म (शाळा आणि क्रिडांगन फोटो आवश्यक )
10) खेळक्रिडा : 1 फॉर्म
11) सुची : 7 फॉर्म
12) परिवहन सुविधा : आसेल तर एक फॉर्म
13) शैक्षणिक : 5 फॉर्म
14) फी : एक फॉर्म
  *
💻शाळा या पोर्टल मधील 14 प्रकारच्या या सदरामध्ये जी जी माहिती लागु आहे ती माहिती भरुन प्रत्येक फॉर्म Update करुन Finalize करा.जर एखादा फॉर्म आपल्या शाळेस लागु नसेल तर तसाच ब्लॅंक फॉर्म  Update करुन Finalize करा सोडुन देवु नका.
* तुम्ही तुमच्या शाळेची किती टक्के  माहिती भरली आहे हे पाहण्यासाठी Progress Bar वर क्लिक करा आपणास कोनती माहीती किती टक्के  भरली आहे आणि कोनती बाकी आहे त्याची टक्केवारी दिसेल आणि कोनता फॉर्म भरुन अपडेट आणि फायनलाइज्ड करायचा आहे ते पण स्टेटस दिसेल.

* माहिती भरत आसताना मी चुकेल .कशाला माहिती भरु ? मला जमनार नाही आसा गैरसमज मनातुन आगोदर काढुन टाका कारण तुमचा एखादा फॉर्म चुकलाच किंवा आणखी शाळा माहिती चुकलीच तर मा.केंद्रप्रमुखांच्या लॉगीन वरुन तुमची आणखी शाळा किंवा जो फॉर्म चुकला आहे तो एकच फॉर्म रिटर्ण करता येतो.त्यानतर पुन्हा तुम्ही तो फॉर्म योग्य महिती भरुन अपडेट करुन फायनालाईज्ड करा.

* आता तुमची शाळा माहिती भरन्यासाठी सज्ज आहात .ही माहीती चार चार दा वाचा किंवा याची प्रिंट काढुन समोर ठेवा आणि शाळेची माहिती भरा.

** प्रत्येक गुरुजी हायटेक गुरुजी झाला पाहिजे.**

मित्रानो मोबाईलवरुन सुधा काम सुरु करा .मी दिलेल्या माहितीमध्ये काही चुक आसेल तर आपल्या तालुका , जिल्हा लेवल किंवा परिसरातील सरल जानकार व्यक्तीकडुन अधिकची माहिती घ्या किंवा सरळ हेल्पलाईन वर कॉल करणे .धन्यवाद .
💐💐💐💐💐💐💐

No comments:

Post a Comment